नांव खरे घेवुनी इमाने झाले जगणे कठिण आता -
खोटे नांव घेवुनी फिरणे ते जगणेच कशाकरिता?
खळखळत क्षण हंसण्याचे झाले दुर्मीळ आता -
क्षणॉक्षणी खोटे रडणे ते जगणेच कशाकरिता?
कुणा कांही निरपेक्ष देणे होत नाही शक्य आता -
बेशरम घेणे कुणाकडोनी ते जगणेच कशाकरिता?
नाही येत भुते कोणी शिते संपलीत आता -
शिते शोधीत फिरायचे ते जगणेच कशाकरिता?
पाहुनी माझी अवस्था मंदशी हंसलीस आता -
नजरेत तुझ्या आश्वासन अन्य विचार कशाकरिता!!