चातक

त्या झाडाखाली बसले  होते  मी;

गतकाळाचा विचार करत वेड्यासारखी;

हा तर एक नेहमिचाच बहाणा होता;

तुला एकांतात आठवण्यासाठी.

तुझं माझ्या आयुष्यात येणं;

हे कदाचित विधिलिखित होतं;

पण तुझं माझ्या आयुष्यातून जाणं;

माझ्या जिवनात अधोरेखित राहिल.

माझं तुझ्या मनाप्रमाणे वागणं;

हे नेहमीचचं झालं होतं;

तरीसुद्धा माझ्या डोळ्यात ;

तुझं स्वप्न मि जपलं होतं.

मि कित्येकदा रागवायचे, रुसवायचे;

रडायचे सुद्धा एकांतात;

पण तुला कधी कळलचं नाहि;

मि जळतं होते अश्रुंच्या थेंबात .

माझं जळणं बघुनतरी तु;

काजवा बनून भिरभिरशिल असं वाटलं होत मला;

तुझा सहवास लाभून माझ मनं;

चातकासारख त्रुप्त होइल अस वाटल होतं मला.

आतासुद्धा आपण दोघे एकत्रच असतो;

अगदी नदीच्या काठां सारखे;

मला बोलायचं असत तुझ्याशी खुप;

पण माझ्या डोळ्यात राहिला आहेस तु अनोळखी बनुन.