अभिषेक बच्चन

 शाहिस्तेखानाने दिलेले उघड आव्हान बघून आम्हाला राहवलं नाही  

अभिषेक बच्चन आणि त्याच्या करोडो (? ) पंख्यांना समर्पित....

स्टार हा झाला खरा... अभिषेक बच्चन
अमितजींचा हा  हिरा... अभिषेक बच्चन

नाच, दस, दिल्ली सहा, उमराव नि द्रोण
करमणूकीचा झरा?... अभिषेक बच्चन

धुम, गुरू, सरकार, दोस्ताना अन युवा
यात थोडा हा बरा... अभिषेक बच्चन

चोपडा, रामू, मणी आणिक करण जोहर
हेच याचा आसरा... अभिषेक बच्चन

रोल नात्यांचा मुळे प्रत्येक मिळतो
ऍश याचा कासरा... अभिषेक बच्चन

कोणती ती चीज हा खपवेल सांगा
ऍडमध्ये वापरा?... अभिषेक बच्चन

स्क्रीन वर येताच हा शोधून बघतो
कोपरा अन कोपरा... अभिषेक बच्चन

खान, खन्ना, दत्त नावडतात ज्यांना
दाखवा त्यांना जरा... अभिषेक बच्चन