भैया हलेना

(श्री भा रा तांब्यांची क्षमा मागून त्यांच्या चाफा बोलेना ह्य अगीताचे सैर विडंबन)

भैया हलेना भैया चालेना
भैया खंत करी काही केल्या परतेना

गेले 'जोगेश्वरी' च्या गोठी
म्हटली म्हशींसवे गाणी
आम्ही दूधात पाणी मिळवून रे

आले सप च्या मनी
अबू बरळला जनी
राजास पाहून गळाले हातपाय रे

हा तर संजय निरूपम
करी जिवाची तगमग
म्हणे राहू आपण दोघे जण रे.

चल ये रे मूलायमा
घालू आपण छट पूजा
लाठया काठ्यांनी करू दांडगाई रे

अमर सिंगाचे किडे
ह्यांचे लक्ष मतांकडे
आपण करू एकगठ्ठा मतदान रे

भैया फूली (xxx) आला खूलून
गेल्या सर्व दिशा आटून
इथे भैया मग कुठे मुंबईकर रे.