यशाचा कळस!

सुखासीन जीव/ आळसे पोशिला/

निद्रा आराधना/ प्रिय त्यासी /

ऊठ की रे मना / हाती घे आसूड/

मारी फटकारे / ताडी त्यासी /

ऐसे केलियाने/ काय होते बघ /

मेद झडतसे / झडकरी /

कामाला लागता / शरीर हे माझे /

चैतन्याचे वारे / संचारते/

स्फूर्ती जयघोष/ कानी बहरती /

प्रतिभेचे नारे/  गुंजताती /

निराशेचे सावट / आता दूर पळे /

यशांचे कळस / दिसो लागे/