(अगदी विचित्र सारे)

आमची प्रेरणा-
भूषण कटककर यांची छप्परतोड रचना- अगदी विचित्र सारे

अगदी विचित्र सारे देवा तुझे नजारे
कविता लिहायचे ते, का तोडतात तारे?

वाटेल का बरेसे कवितेस या ठिकाणी?
फोफावलेत जेथे वृत्तात कुंथणारे !

गतिरोधके कशाला नडतील सांग आम्हा?
अमुचे विमान आहे आकाश खोदणारे !

खुजली कशी निघाली लपवून ठेवलेली...
सर्वांसमक्ष आता ती खाजवून घ्या रे !

इतकेच जर कवीचे असतील शुद्ध हेतू,
का शोधतात भोके? हा ढुंकतात दारे?

प्रांती विडंबनाच्या आलाय 'खान' आता
फुटतील कल्पनांना आता नवे धुमारे !

+++++++++++++++++++++

(अवांतर- दुवा(लिंक) कसा देतात?)