(किती धीर ठेवू)

आमची प्रेरणा : भूषण कटककर यांची गझल "किती धीर ठेवू"

मदिच्छा असे की मिळावा मलाही
पुरस्कार लाटून घेणे कला ही

असा मी तिचा काज आहे गळ्याचा
कधी लागतो, अन्‌ कधी मी खुलाही

किती वाट पाहू ? किती धीर ठेवू ?
कधी मी बघावे तिच्या ’शेप’लाही ?

कशाला तिची प्रेमपत्रे जपावी ?
किती टंकते ती तुलाही, मलाही !

अरे पाच झाले पुरे शेर माझे
जमू लागले, खोडसाळा, मलाही