माझा सोनुला सोनुला
साऱ्या जगाहून वेगळा
त्याच्या डोळ्यांमध्ये हसे
साऱ्या सृष्टीचा सोहळा
माझा सोनुला आहे
जरा सावळा सावळा
त्याच्या चेहऱ्यावर भासे
मज नित्य कृष्ण काळा
माझ्या सोनुल्याच्या पुढे
थोडे गीता आणि कुराण
या सोनुल्यातच वसे
माझ्या अंतरिचा प्राण
माझा सोनुला चाले
चोहिऔर दुडुदूडू
त्याच्या पावलासंगे चाले
या काळजाचा वेळू