इंग्लिश गझल - माझ्या कल्पनेतली!

मॅठल्यात ऍलॅमटची सूठ घॅटली हाय!

लांब घालू स्कर्ट, घेती सासरी ऑब्जेक्शने
लागली चालूच होती माणसांची फिक्शने

बर्गरावर सॉस घ्यावा, लग्न हे अगदी तसे
चार्ज देउन सॉस एक्स्ट्रॉ घ्यायची ऍडिक्शने

नायगारा, गार वारा, चुंबने भलताच घे
मारतो तिसराच, दुसरा फक्त काँट्रॅडिक्शने

लासच्या वेगासला मी लास झाले एकदा
जन्मभर सासू दिराची ऐकते कन्व्हिक्शने

अस्वलांच्या सारखे दिसतात डॉगी याइथे
पर्समध्ये ठेव त्यांना, लाव तू रिस्ट्रिक्शने

इंडियन दे पिकल थोडे, जीभ ही डोहाळली
नेमके समजेचना 'मिस'ली कशी प्रेडिक्शने!

तो बरासा वाटतो आता मला शेजारचा
पाहुया पटतात का नवऱ्यास व्हॅलेडिक्शने

वाटले पहुडू जरासे बीचवर गर्दीमधे
पाहण्या कोणीच नाही, जाहली रेलिक्शने

स्टेट्स ला मी राहणे सोडायचे म्हणते अता
फार लोकांशी इथे होऊन गेली फ्रिक्शने