क्षण सुखाचे अवती भवती
मुक्तपणे वेचाल का?
व्यर्थ ऐशा मान-पाना,
दंभासवे त्यागाल का?
दुःखदायी त्या क्षणांना
थोडेतरी विसराल का?
जीवन-पुस्तक उघडे पुढती,
रंग त्यातील निरखाल का?
निसर्ग दावी अपार वैभव,
मस्त मजेने लुटाल का?
प्रसन्न मनातील हास्यमेवा,
मित्रांमधे वाटाल का?
गंधभरल्या आनंद डोही,
डुंबणे आवडेल का?
क्षण सुखा हे अवती भवती,
मुक्तपणे वेचाल का?