तू भले सांग जगाला !

तू भले सांग जगाला
तू कधी प्रेमच नाही केलंस !

पण मी येईनच फिरून
तुझ्या प्रत्येक कवितेच्या
प्रत्येक ओळीच्या
प्रत्येक शब्दातून
आणि करीन तुला
अस्वस्थ, उदास
सुन्न, विषण्ण

खात्री आहे मला
होईल जेव्हा अनावर तुला
लपवून ठेवणं
तेव्हा करशीलच कबूल
कधीतरी दोघांती
की प्रेम कधीकाळी
केलं होतंस
तूही माझ्यावर

मग भले तू सांग जगाला
तू कधी प्रेमच नाही केलंस !
तू कधी प्रेमच नाही केलंस !
तू कधी प्रेमच नाही केलंस !