मी कुठे घातला, सोसण्याला बांध अजून
भावनांच्या नाजूक कळ्या, हौशेने रौंध अजून
नाही रुचलं कधीच, फुलांशी रेशीम नातं मला
नाही मोडला मीही, काट्यांशी संबंध अजून
कोण म्हणतं आयुष्याच्या, परीक्षेत नापास झालो
कुठे लिहायला घेतला, मी शेवटचा निबंध अजून
जरी आपलं नातं, अनोळख्याहून अनोळख्या सारखं
तुझ्या आठवणींचा दरवळतो, जिवनात सुगंध अजून
मला जाळण्याची क्षमता, कुठे लाकडांमध्ये होती
भिजवून दारूत मला, करा जाळण्याचा प्रबंध अजून
ते आतंकवाद पसरवतात, आम्ही मैत्रीचा हात
का बरं मुके बहिरे नि, डोळे असून अंध अजून
@सनिल पांगे