फिनिक्स

वादळं येतात
वादळं जातात
उध्वस्त घरटी
पुन्हा वसतात
पेचलेल्या झाडाला
नवी पालवी फुटते
वाऱ्याची झुळूक
पुन्हा संयमी सुटते
'जिवन' त्याचा प्रत्यय
विनाशातूनही देतो
अवशेषांच्या ढिगाऱ्यातून
फिनिक्स जन्म घेतो
@ सनिल पांगे