काही असावे

मुग्ध हास्यात मिळणारे काही असावे
स्तब्ध रुसण्यात टळणारे काही असावे
रुसून जेव्हां तुला जवळ घेतो तेव्हां
त्या घट्ट मिठीत छळणारे काही असावे
खंबीर जरी कितीही मन का असेना
एका अश्रूंनेही वितळणारे काही असावे
तुटत्या ताऱ्याकडे काही मागण्या ऐवजी
डोळ्यातून निखळणारे काही असावे
घट्ट पकडूनही आयुष्य का जपता येते
घट्ट मुठीतून गळणारे काही असावे
मैत्रीच का सर्व देऊन वा घेऊन जाते
तसं शत्रुत्वातही फळणारे काही असावे
@ सनिल पांगे