मी पाहीले तुला.

मी पहीले तुला असेही,

श्रावणाच्या बहरलेल्या आभाळात, इंद्रधनू होउन ओघळतांना.

पावसाच्या थेंबा थेंबा मधून तुझ्या अश्रुंना विरघळतांना.

सोसाट वारयात तु गारवा होउन सळसळतांना,

ध्येयासाठी घामाच्या ओलाव्यात तुला कळवळतांना,

मी पहीले तुला असेही,

डोकावतांना डोगंरा आडून सकाळ होतांना,

डोळ्यात स्वःत रान्न गोठउण दुसर्याला उजेड देतांना,

मी पहीले तुला असेही हो खरच.