सोबत

सोबत फ़िरत असतांना
पदर तूझा ढळला
आणि पदरासोबत
क्षणभर माझा संयमही

म्हणुनच का आजकाल भासे
तुझ्या प्रितिचा तो सहवास गोड
का मनी सतत भासे
अनामिक हुरहुर आणि ओढ

जाणिवेपलीकडील प्रेमाचा
अर्थ आज मला कळला
तुझ्या ओल्या स्पर्शासाठी
चिंब मनातिल श्रावणही रुसला

म्हणुनच सखे
श्रावणासारखी तुही माझ्या जीवनात ये
आणि माझ्या प्रत्तेक क्षणाला
श्रावणसरीत न्हाउन घे