वाट वड आणि आयुष

येणारे येतात
जाणारे जातात
वाट मात्र तशिच राहते
येणार्‍याचे स्वागत करत
जाणार्‍याला निरोप देत
एकटी एकाकी निशब्द.

त्या वाटेवरील वड सुद्धा
असाच आपला एकाकी आहे
काल घरट थाटनारा पक्षी सुद्धा
आज मात्र परका आहे

आपले आयुषही असेच असते
अनेक येतात जातात
मन मात्र जगत असते
कुणितरी आपल होइल या आशेवर
रात्रंदिवस, दिवसेंदिवस