जात ही पावसाची,
नयन रम्य सहवासात, ढगा आड लपण्याची,
मी तीच्यासोबत असतांना, संयम धरण्याची,
आणि विरहात कासावीस होत असतांना,
माझ्या अश्रुंना सोबत करण्याची,
जात ही पावसाची,
तहाणलेल्या जमिनीला तरसवण्याची
अंगणात अवतरणार्या अगंतुक पाहुण्याची,
स्व:त सगळ आभाळ हूदंडुन,
सगळ्या जगाला वाट पहायला लावण्याची
जात ही पावसाची,
सवय नेहमीच अवेळी बरसण्याची,
रस्त्याकठची भुकेली चुल मध्येच विझवण्याची.
अमिराच्या छतावर बिनघोर बरसून,
गरीबाला एकटेच गाठून भिजवण्याची.
जात ही पावसाची.