दूर अंतरी असशी तेव्हा
ओढ ही केवढी असे मनी
जिव्हाळ्याचा स्पर्श हवासा
श्वास घुमावासा वाटे कानी..
अंतरे संपती भेट होता
वाटे तगमग होई दूर आता
दोन जीवांचा सरूनी दुरावा
जुळतील साऱ्या प्रेमवाटा..
भेटगाठ होता पुरती
नयनांस नयने जुळती
अलगद हसू ओठान्वरती
परी अपूर्णतेची ही जाणीव कसली??
हात प्रेमाचा फिरावा पाठीवरूनी
व्हावी विश्वासाची जाणीव त्यातूनी
गोड वाटावा प्रत्येक शब्दअ
न व्हावे असे ते कदाचित त्या कारणी...
-- श्वेता.