खायाला फुटाणे
न टांग्याला आठाणे
बाप लढतो पोटाशी
मौज मारती शहाणे
वाढलेल्या झिपऱ्या
बुडाखाली गाडी
तोंडात बिडी
तिही बापाचीच
जागो जागी भाईगिरी
पोटासाठी मारामारी
अंगामध्ये ताकत भारी
तीही बापाचीच
पोरगी मामाची
संसाराची गर्दि
डोक्यावरती अक्षता
त्याही बापाच्याच
सगळं काही बापाच
माझ ते काय
बुडावरती लाथ
जगामध्ये कोण नाय