केस मोकळे तू सोडावे
आणि आभाळ भरून यावे
खळ खळाटी हास्याने तुझ्या
काळ्या मेघावर त्या लकलकावे
नयन कटाक्षाने तुझ्या
अतोनात ते मेघ गर्जावे
केस झटकता ते हाताने
पावसाने त्या लाजावे
लाजळु पावसाकडे पहातांना
सस्मित पुन्हा तू हसावे
हसण्याची तुझ्या बिजली व्हावी
आणि पुन्हा आभाळ लकलकावे
अलोक जोशी