असेही उपक्रमशील शिक्षक

आज लोकमतच्या "मंथन" पुरवणीतील हा लेख वाचला. आपण नेहमी चर्चा करताना शिक्षण कसं दिलं पाहिजे याबद्दल लिहितो. प्रत्यक्ष काम करणारे नाहीतच वगैरेची ओरड करतो. ह्या लेखात काहीतरी वेगळं करण्याची जिद्द असणाऱ्या शिक्षकांबद्दल आणि त्यांच्या उपक्रमाबद्दल माहिती आहे.

याच लेखातून मिळालेल्या दुव्यावर  श्री. अरविंद गुप्ता यांचे संकेतस्थळ म्हणजे एक भांडारच आहे. शैक्षणिक खेळणी, इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेतील अनेक पुस्तके आणि शैक्षणिक चित्रपटही आहेत.

त्यात फार पूर्वी गाजलेल्या "तमस" या मालिकेचे भागही आहेत.

अजून वाचणे व बघणे चालू आहे. अशीच काही संकेतस्थळे असतील, तर कळवा.

धन्यवाद.