हाय !

देहाविना कधीच नसते अस्तित्व सावलीला

सावलीनेच मग कां असा देहाचा ग्रास करावा?

दांड्यास बळ अनोखे संगे कुऱ्हाड असता

कां कार्य साधताना तो दांडाच काळ व्हावा?

क्षितिज कवेत घेण्या गती हवी पावलांना

धावत्या पावलांचा कां धोंड्याने घात करावा?

संकल्प उदार करुनी कार्यास हात घालावा

दैवानेच मग कां असा मध्येच मोडता घालावा?

अंधुकसा प्रकाश देण्याचा विचार मनात येता

माझ्याच सावलीचा अता मज न वाटे भरवसा!