एक कळी

एक कळी
खुदकन हसली
गाली तिच्या
आज वेगळीच लाली

खुलली थोडी
भुलली थोडी
स्वप्ना मध्ये
हरवली थोडी

कळले नाही
घडले काही
वेड्या मनाची
वेडीच खोडी

श्वास धुंद धुंद
गंध मंद मंद
कळीच्या मनाला
आज वेगळाच छंद

नकळत सारे
अवचित घडले
अहो ! वेड्या कळीचे मन
आज प्रेमात पडले