जोगवा

तुझा जोगवा मागताना
मन झाले ग व्याकुळ
विचारांची बडबड
ठरली ग बाष्क्ळ

साधनशुचितेचा बोजवारा
झाला निरर्थक निष्फ्ळ
आनंद भक्तीचा निखळ
ओसंडून गेला ग

आज तुझ्या मायेची
पाख्रर केली मी पारखी
स्वच्छ झाले समोरचे
जग आनंदे भरले