गंधाळलेल्या वाटेवर
मधुर सुंगधी वाऱ्याने
सांगितलेल्या जागेवर
उभा आहे अजूनही
सादेसाठी अतृप्त कान
सहेतुक शोधितं नजरा
भेटीच्या हुरहुरीने
उभा दृढ योग्यासम
डोईवरचा उभा दिवस
पाया जवळ पार ओणवा
अजूनही आशेला कुरवाळत
उभा जागेवर स्थितप्रज्ञाप्रत
हा ही एक योग
हि हि एक साधना
प्रेम योगच रे हा
भले दिवाणा म्हणा