झटपट सोलकढी

  • ३ वाट्या नारळाचे दूध
  • किसलेले आले पाव ते अर्धा चमचा (चवीनुसार)
  • १-२ चमचे कोकमाचे पाणी/ आमसुलाचे आगळ
  • सैंधव चवीनुसार
  • चिरलेली कोथिंबीर
५ मिनिटे
२ जणांसाठी

सर्व जिन्नस एकत्र करावेत, व्यवस्थित ढवळावेत व गार करून किंवा सामान्य तापमानाला ठेवून तयार सोलकढीचा आस्वाद घ्यावा.

सैंधवामुळे अतिशय रुचकर होणारी ही सोलकढी पाचक, अग्निदीपक, चविष्ट व सौम्य आहे. तयार व्हायला अक्षरशः ५ मिनिटे लागतात.

-- अरुंधती कुलकर्णी.