पांथस्थांची मने - ४

 


पांथस्थांची मने - ४


 


बायको प्रेयसीच राहीली असती..


तर..किती छान झालं असतं


तुमचं आमचं मन असं


उनाड रान झालं नसतं


 


बायको कधीच भांडली नसती..


तर मनाला गंध नसता..


तुम्हा आम्हाला करमणूकीचा


दुसरा कुठलाच छंद नसता..


 


बायको पटकन आवरून जर


झट्कन तयार झाली असती..


खिडकीतून डोकावण्याची..


तुमची संधी गेली असती..


 


बायकोने गाणं गायलं नसतं


तर नक्कीच जागरण झालं असतं..


रागदारीच्या पुन्हा नशीबी


असं फुटकं जीणं आलं नसतं..


 


बायकोने संशय घेतला नसता..


तर तुम्ही प्रेमीच राहीले असते..


लपून छ्पून तोंड लपवून


असे फ़ुटाणे खाल्ले नसते..


 


बायकोने चहा केलाच नसता..


तुम्ही उगाच असं भांड्ला नसता..


मिशीवरून जीभ फ़िरवताना..


जन्म सुकाच गेला असता..


जन्म सुकाच गेला असता..


 


माधव कुलकर्णी (संपाद्क)