सत्य हवे तर , पथ्य पाळा, शिस्त पाळा
पथ्य पाळलेत तर चेहरा लांब होईल
मग हातात काठी घेऊन
विनाकारण चष्मा लावून
जीवनाची महती सांगाल
म्हणाल , 'जीवन हॅ अगर जहर तो पीलानाही पडेगा'
लोक विचारतील "कां"?
तेव्हा सांगाल का ?
जीवन सोपे व्हावे म्हणून
अहो ,गर्भाधानापासून श्राद्धापर्यंत्च्या विधींची सक्ती आहे
जगण्याचीही सक्ती आहे , मरणाचीही सक्ती आहे
सती जाणं जरूरी आहे पुरुषांनाही
अहो, षंढासारखे निक्म्मी जगणं कस मंजूर कराल ?
सगळ्या गोष्टींतील सत्य उघडे करून किती पाहाल?
म्हणूंच म्हणतो, 'आता सतीची वाणे वाटू या!
व्हीडीअओ शूटिंग नक्कीच होईल
सत्याशिवाय अमर होऊ,
कारण आम्हाला हवे आहे
फक्त कफन, नंगेपण झाकायला
शिक्षणाची लक्तरे पांघरून आता कंटाळा आला
आता हातात दंड घेऊन मी समाजाचा
न्याय करायला बाहेर आलो
तेव्हा मात्र खजील झालो
न्यायाची गरज सर्वांनाच
मग लांब लायनी लागल्या
काहींनी पॅसे देऊन न्याय मिळ्वला
तर काही तोंडे वाकडी करून
आपापल्या काळ्या वकीलांना घेऊन
पळून गेले सती जायला
म्हणूनच म्हणतो
"सत्य हवे तर पथ्य पाळा, शिस्त पाळा".