काहुर

माझ्या मनात का रे आज काहूर हे उठावे;
जे सांगायचे तुला का औठांवरी न यावे

माझेच शब्द सारे पण अर्थ तुला कळावे.
डोळे फितुरं माझे झाले तुझे दिवाणे.

मी रातराणीचा गंध तुझ्या साठिच शिंपडावा;
जगने तुझे असावे पण श्वास माझा असावा;

तुझ्या असण्यानसण्याचा वेडा लपंडाव चालताना;
तुझ्या साऱ्या आठवांचा निवारा माझ्या मनी वसावा.

वाटे मनास माझ्या मी तुझिच फक्त व्हावे
मी सावली बनुनी आता तुझ्यासवेच राहावे;

हातात हात माझ्या नेहमी तुझे असावे;
पाउल कुठे अडखळता तु सावरून घ्यावे.

हि वास्तवता म्हणू कि माझ्या कल्पनेतिल स्वप्ने
त्यांची व्याख्या ठरविणे फक्त तुझ्या हातात आहे;

औळख भावना या झाले फितुर शब्द माझे;
तुला अर्थ औळखाया मी हे छेडले तराणे.

माझ्यातली मि अनोखी भेटो तुला नव्याने;
न सांडताच शब्द माझे तुला सारे कळून यावे;

तु औळखून डोळे माझे मजकडे पाहून गोड हसावे;
तुझ्या मिठित विरघळताना मी तुझ्यासारखीच होत जावे.