चौकट एक फोटोची
चौकट एक घरची
चौकट एक मनाची
चौकट एक समाजाची
किती चौकटती घेउन
मनातल्या मनातच
जगतो आम्ही, होय आम्ही
नसलेल्या राज्याचे राजे होउन
मनाचेच राजे आंम्ही
साध्या शिपायाची किंमत नसलेले
मोठिच स्वप्न असतात
पण निराशेचे पाने पुसलेली
उठा अरे जागे व्हा
आता नाही तर केंव्हा उठणार
आपलेच स्वप्न हातात धरायला
आता नाही तर केंव्हा पळणार
जाणिवा बोथट होण्या अगोदर उठा
वाऱ्याच्या वेगाने सुटा
राज्य निर्माण करण्यासाठी उठ
ऊठा! काळ आता आपलाच आहे