पेग

प्रेरणास्त्रोत - श्री. यशवंत जोश्यांचा 'श्वास'

पहिल्या पेगपुर्वी

सचेतन शब्दशुन्यता

गात्रांची शयनशीलता

पहिल्या पेगनंतर

मिटल्या डोळ्यांच्या मागे

अंधाराच अधिराज्य

उमलत्या प्रकाशाच भय

(कोणी ओळखणार तर नाही ना? )

पहिल्या पेगनंतर

गात्राना जाग (तरतरी)

जीवनाच स्वागत करणार रुदन (बडबड सुरु)

सभोवती उमलणारा आनंद (सभोवतालचा कोलाहल)

रेशीमबंधांची नवी गुंफण (समान शील आणि व्यसनांची मैत्री)

दुसऱ्या पेगनन्तर

अर्धचेतन शब्दशुन्यता (शब्द अडखळू लागतात)

गात्रांची बलहिनता (तोल जाणे)

अंतिम पेगपुर्वी

मिटल्या डोळ्यांच्या मागे

अनुपम प्रकाशाच आवाहन

निर्भय प्रवासाची ओढ

(आता विमान हवेत तरंगू लागलय)

निरोपाची उलघाल

अंतिम पेगनंतर

आक्रसणारी खिन्नता सभोवती (सब खोये हुए है)

कोमेजलेली मने

व्यक्त अव्यक्त आक्रंदन (शिवीगाळी सुरु)

रेशमबंधांच समर्पण ( भान्डाभान्डी)