फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन चिकित्सा

काही दिवसांपूर्वी ओपन ऑफिसच्या रायटरमध्ये शुद्धलेखन चिकित्सा कशी करायची याबद्दल मी एक छोटेखानी लेख लिहिला होता. आज फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन कसे तपासायचे ते पाहूया.
फायरफॉक्स वापरत असाल तर खालील पानावर जाऊन मराठी डिक्शनरीचे एड-ओन जोडून घ्या. इंटरनेट एक्स्पोअर वापरणाऱ्यांसाठी अशी सुविधा आहे की नाही ते मला माहीत नाही.
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/12797/

फायरफॉक्स पुन्हा सुरू करा. आता चुकीचे मराठी शब्द लाल रंगात दिसू लागतील. त्या शब्दांवर राईट क्लिक करून योग्य शब्द निवडता येईल. उजवी क्लिक करून "चेक स्पेलिंग" च्या पुढ्यात बरोबरची खूण दिसते आहे याची खात्री करून घ्या. तसेच लॅग्वेजेस या पर्यायात आता मराठी दिसू लागले पाहिजे आणि त्या पर्यायावर क्लिक केली की त्याच्यापुढे बरोबरची खूण येईल.

एखादा शब्द बरोबर असून लाल रंगात अधोरेखित होत असेल तर तो शब्द आपण आपल्या व्यक्तिगत संग्रहात "ऍड टू डिक्शनरी" हा पर्याय वापरून जमा करून ठेवू शकता.  
डिक्शनरीने चुकीचा शब्द सुचविला तर त्याचा अर्थ मूळ स्रोत सुधारायला हवा. या  दुव्यावर कोणता शब्द डिक्शनरीत नको ते नोंदवा म्हणजे पुढील
आवृत्तीत सुधारणा करता येईल.
(वरील मजकुराची शुद्धलेखन चिकित्सा फायरफॉक्स मधील हेच एक्श्टिंशन वापरून केलेली आहे.)