जिवन आहे म्हणून, जगणे आहे
शिल्लकी भोग भोगणे आहे
न चुकती भोग कुणा कधी
भोगासाठिच हे जगणे आहे
चिरंजिव हे वरदान जगण्याचे जर
अश्वथामा आज ते भोगतो आहे
तो हि सांगेल भोग भोगणे
व्यथा जन्माचि, आज ती तो भोगित आहे
जोगी असो वा असो प्रपंची
असो अथवा वा कुणिही रोगी
असो ईश्वर जरी धरणीवर
तो हि भोग हे भोगत आहे