माझ्या साऱ्या जगण्याचा हिशेब;
मला माझ्या आयुष्यानं मागितला;
मी उत्तर तरी काय द्यायचे;
मला माझ्या जगण्याचा अर्थच न उमगला.
जगण्याच्या प्रत्येक पायवाटेवर;
माझं नशीब माझ्या बरोबर असायचं;
पण त्या पायवाटेवर कधी;
माझ्या पाऊलखुणांचं नसायच्या.
जगण्याची गोळाबेरीज मांडायचा ;
प्रयत्न मी आजही करतोय;
बाकी नेहमीच शून्यं राहते;
अन हातचा काही न उरतोय.
हे आयुष्य जगताना माझी;
मृगजळासारखी फसगत झाली;
चाललो होतो जिथून मी पहिला;
तिथूनच पुन्हा सुरवात झाली.
तुम्हीच सांगा मला आता;
मी हिशेब काय द्यायचा;
उरलो मी हा रिक्त असा;
जगण्याचा अर्थ कसा शोधायचा