धुंद रात्र

तुझ्या सहवासाची धुंद मधुरात्र
सखे उमलले माझे गात्र न गात्र

शुभ्र कुंदकळ्या किंचित विलगती अधर
क्षणमात्र लखलखे वीज मिळता नजरेस नजर
सिंहकटी तू कोमल मृदुल तन्वंगी
स्वप्न माझे साक्षात उतरले अंगोपांगी

लाजेचा फुलला रक्तिमा गालावरी
अवखळ बट बावरी खुलते मुखमंडलावरी
अधोवदन तू मिलनोत्सुक नजर
माझे ओठही अधीर प्याया अधर रस

विखुरला केशसंभार मखमली रेशमापरी
नागीण जशी सळसळते वीजेपरी
आत कशास वाटे लाज तुला गे, ये जराशी जवळी
सर्वस्वाने अर्पण होण्या विसरून दुनिया सारी

सुप्रिया