लहानपण

रिमझिमणारा पाऊस
टप टप पडणार्या गारा
हिरवी गर्द झाडी
ओला आसमन्त सारा
फेकून देऊन छत्री मला मनसोक्त भिजायचय
एकदा पुन्हा मला लहान व्हायचय

गाणी गाणारे भुन्गे
फुलपाखरे बागडणारी
इवली इवली पाने
अन रन्गीत फुले फुलणारी
फुलपाखरान्च्या मागे मला मनसोक्त हुन्द्डायचय
एकदा पुन्हा मला लहान व्हायचय

गोड गुलाबी थन्डी
पहाटेची वेळ
आजीच्या सुरेल ओव्या
त्याला जात्याचा मेळ
गोधडी गुरफटून मला मनसोक्त झोपायचय
एकदा पुन्हा मला लहान व्हायचय

आईच्या प्रेमाची कूस
बाबान्चा आश्वासक हात
आजी आजोबान्ची ममता
दादाची कौतुकाची थाप
सगळ्यान्च्या प्रेमात मला मनसोक्त नहायचय
एकदा पुन्हा मला लहान व्हायचय

सुप्रिया