अस्तित्व

उंच उंच भरारी घेऊन उडत गेले तरी

दुःखाचा सागर काही होत नाही कमी

समुद्राच्या कितीही तलाशी गेले तरी

शीतलता सुखाची सुखावत नाही खरी

म्हणून तर मी झुलत राहिलीय अशी

अथांग समुद्रातील एकाकी बेटासारखी

वात बघत आहे एका वादळाची

जे जाणीव करून देईल माझ्या अस्तित्वाची...