मला या पावसात भिजायचयं
तुझ्या ओठांवर हास्य होउन रुजायचयं,
विसरून सारी दुःखे माझी
मला तुझ्या मिठीत रुजायचयं..
तुझ्या नकळतं मला तुझ्या
मनातल्या समुद्राची गाज व्हायचयं,
तुझ्या आठवणीतल्या स्वप्नांची
त्या तुझ्याच डोळ्यांची जाग व्हायचयं...
माझं सारं आयुष्य.. जगणं
माझं असं तुला देउन सारं,
मला विसरून सारं झालं-गेलं
तुझ्या जगण्यातला एक श्वासं व्हायचयं....
जयेंद्र लांडगे.