अताशा तुझ्यासाठी काही
लिहावेसं वाटतयं,
पुन्हा माझ्या डोळ्यांना
स्वप्नं पाहावेसं वाटतयं.
तुझा हात हाती घेउन
चालावेसं वाटतयं,
मनाचा अबोल कप्पा खोलून
खुप बोलावेसं वाटतयं..
तुझ्या सोबतीने झालं-गेलं
विसरावेसं वाटतयं,
बोटांमधल्या रित्या जागांना
तु येउन भरावेसं वाटतयं...
जयेंद्र लांडगे.