आठवण

उसवलेल्या काळजाचे ते
टाके आज पुन्हा तुटले
होतो धनी काळजाचा सखे मी
आठवणीने आज पुन्हा लुटले

        येणे पुन्हा न आता  होणे
        दर्पात बोललो कधी मी
        फिरतो अजूनही मी वेडा
        आठवणीत तुझ्याच माघे

वासाने त्या मोगऱ्याच्या
आजहि कंप काळीज पावे
भास तुझ्या पैंजणांचा
डोळेच पाऊस व्हावे

         मोकळे व्हावे नव्याने
         बंदिस्त काळीज माझे
         दगा देई पुन्हा मला ते
         आठवणीत तुझ्या ते असावे