"ऋतू गझलांचे" या जयंत कुळकर्णी लिखित मराठी गझलांच्या 'सीडी' चा प्रकाशन सोहळा रविवार दि. १९ जुलै २००९ रोजी गझलनवाज श्री. भीमराव पांचाळे यांच्या शुभहस्ते डोंबिवली येथे निमंत्रितांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या गझलांना डॉ. आश्विन जावडेकर यांनी संगीतबद्ध केले असून संगीत-संयोजन सागर टेमघरे यांचे आहेत. ह्या गझला गायल्या आहेत सुप्रसिद्ध गायक रविंद्र साठे, पल्लवी केळकर, विनायक लळित व आलाप जावडेकर ह्यांनी.
कार्यक्रम
स्थान "संमेलन" सभागृह, हॉटेल रामकृष्णच्या वर, ऑफ केळकर रोड, रामनगर, डोंबिवली(पूर्व) जि. ठाणे
वेळः सायं ५:३० वाजता
कार्यक्रमः - "ऋतू गझलांचे"मराठी गझलांच्या 'सीडी'चे प्रकाशन
- सर्व श्री. रविंद्र साठे व अन्य गायकांकडून "ऋतू गझलांचे"मधील
निवडक गझलांचे गायन
- चहापान
---- सर्व निमंत्रितांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती ---