अमेरिकेतील मराठी मुले आता मराठी शिकणार

आज म. टा. मध्ये हे वाचले

अमेरिकेत मराठीचा...

म. टा.  दि. १७ जुलै २००९

बातमीतील मुद्दे :

अमेरिकेतील मराठी मुलांसाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाचा मराठी शाळेचा उपक्रम सुरू होणार.

ह्यासाठी लागणारा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बनवणार.

येत्या तीन महिन्यात हे काम  होण्याचा अंदाज.

शाळेतील विविध वर्गांसाठी मराठीच्या अभ्यासक्रमाची आखणी करण्यासाठी रा. मा.  शि. मं. आणि बृममं मध्ये लवकरच सामंजस्याचा करार.

शिकवण्याची पद्धत आणि अभ्यासक्रमाची आवश्यकता यांचा अभ्यास करून मराठीचा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार.

रा. मा. शि. मं. च्या अध्यक्षा विजयशीला सरदेसाई या उपक्रमात लक्ष घालणार.

ही सर्व माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.


  • बृममंची ही मराठी शाळा कोठे असणार आहे?
  • एकाच शहरात की अनेक ठिकाणी शाखा असणार?
  • परीक्षांचे स्वरूप काय राहणार?
  • या शाळांची परीक्षा महाराष्ट्रातील शिक्षण मंडळ घेणार की स्थानिक शाळा?
  • अमेरिकाभर हा परीक्षेचा कार्यक्रम कसा राबवणार?

इ. गोष्टींची कुणाला काही माहिती आहे काय?