बघितले जग आता
खाणे पिणे मौज मजा
जगात आहे सर्व आता
पण जगात राम नाही
हाताला आहे कामही येथे
स्वप्नांनाही आराम नाही
भुल भुलैया मोठे येथे
हातात पण छदामही नाही
सुख नाना येथे येती भारी
कोणाच्या सुखाला बगल देऊन
स्वतःच्याच सुखात आहे सारे
नशिबी कोणाच्या आरामही नाही
भेटतो जो तो मुक्तहस्ते
माप खिच्याचे घेण्यासाठी
बगलेतले जिवंत साप येथे
मित्रत्वाचेतर नावही नाही
भुख येथे मोठी सगळ्यांची
विश्वासच त्याचे खाद्द मोठे
आपुलकिचाच भाव सर्वत्र
विश्वासाचे तर नावही नाही.