सोबतीला ...

हातांची साथ नको ..

सुटतील

डोळ्यांची सोबत नको ...

मिटतील

पावलांची संगत नको ...

थकतील

मला तुझ्या हृदयात असू दे

खोल खोल !

तिथे राहू दे श्वासांच्या तालाजवळ ..

अविरत

तो असेल तोवर मीही असेन तिथे ...

तुझ्या सोबतीला !!