मसालेदार डाळ

  • पाव कप मूग डाळ
  • पाव कप छिलका (साल असलेली) मूग डाळ
  • पाव कप मसूर डाळ
  • पाव कप तूर डाळ
  • २-३ कांदे किसून
  • २ टोमॅटो बारीक चिरून
  • १ टीस्पून गरम मसाला पावडर
  • १ टीस्पून धणेपूड
  • ३ टेबलस्पून तूप/ तेल
  • मीठ व लाल मिरच्या चवीनुसार, कोथिंबीर सजावटीसाठी
२० मिनिटे
३-४ माणसांसाठी

सर्व डाळी वेगवेगळ्या धुवून किमान अर्धा तास अगोदर वेगवेगळ्या भिजवून ठेवाव्यात. त्यांत २ ते २॥ कप पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये व्यवस्थित एकत्रित शिजवून घ्याव्यात. नॉनस्टिक पॅनमध्ये कांदा तेलावर तांबूस परतून घ्यावा. नंतर टोमॅटो घालून तो शिजेस्तोवर पाच मिनिटे परतावा. शिजवलेल्या डाळी हाटाव्यात व त्याही पॅनमध्ये घालाव्यात. धणेपूड, गरम मसाला, लाल मिरच्या व मीठ घालून डाळ चांगली दहा मिनिटे शिजू द्यावी. वाढताना गरमागरम डाळ वरून कोथिंबीरीने सजवून भात, पोळीबरोबर खायला द्यावी.

ज्यांना अजून झणझणीत डाळ हवी असेल त्यांनी कांद्याबरोबर आले लसूण पेस्ट घालायलाही हरकत नाही. तुपाचा खमंग स्वाद वेगळाच असतो, तेव्हा शक्यतो ह्या डाळीत तूपच वापरावे.