भिंतीवरची चित्रे
बोलतात कधी एकांतात
भुतकाळाच्या फाटक्या झोळीत
सापडतात नेहमी भविष्याच्या वाटा
काळजाच्या कोंडलेल्या कळा
ओसंडतात डोळ्यातून, एकांतात
भिंतीवरची चित्रे
बोलतात कधी एकांतात
डोईभरप्रकाश मिरवत इस्ततः
गर गर फिरवणारा पायातला भोवरा
सांझाळलेल्या अशा समई
नित्य तेवते जुनीच समई, एकांतात
भिंतीवरची चित्रे
बोलतात कधी एकांतात
रोज नाचवणारी नेहमीचिच भुते
दिवसाची रोजच रात्र करतात
दंतहीन बसलेला रोजचाच सिंह
टिपे नित्यच गाळतो, एकांतात
भिंतीवरची चित्रे
बोलतात कधी एकांतात
सारवलेल्या अंगणातली रांगोळी
घरातील सारे रंग सांगतात
हंबरणारे वात्सल्य डोळ्यातले
मूर्तिमंत वास्तवात येते, एकांतात.
भिंतीवरची चित्रे
बोलतात कधी एकांतात