बरसता सर एक होते आभाळं कोरडे
निखळता थेंब एक माझी ओंजळ भरते
मन मनाचे भेटणे ओठी पांघरून मौन
स्वप्नी प्रत्यक्ष आभासी बोले मनाशी कोण?
हाकारू मी किती या मनातल्या मना
गाज परतून येते माझा निःशब्द किनारा
असे साधेच अबोल या मनाचे मऊपणं
मनातल्या मनाला समजेल माझेपणं?