श्रीज्ञानदेवांचा हरिपाठ

'मनोगत' जालावर या विषयावरचे उद्बोधक लिखाण चिंतनीय आहे. या विषयावर ह. भ. प. पांडुरंग रामपूरकर (टिटवाळा) यांच्या दीर्घ चिंतनावर आधारित नाम-नवनीत हा ११०० पानी तीन भागातील ग्रंथ टिटवाळ्याच्या 'ज्येष्ठ-राज' सिनियर सिटीझन्स कल्चरल ग्रुप या सामाजिक संस्थेने प्रकाशित केलेला आहे. हरिपाठातील प्रत्येक शब्दाचा मागोवा घेत कर्म, ज्ञान, भक्ती या त्रयींचा विचार हरिपाठात कसा दिसतो, याचे सुंदर विवरण या ग्रंथात वाचावयास मिळते.