लडकी, बस और ट्रेन

मी म्हंटलं, "यू आर ब्युटिफुल,

चल मांडुया आपल्या संसाराची चुल"

ती म्हणाली, " यु आर ब्लडीफुल,

कशी रे पडली तुला माझी भुल?"

मी म्हंटलं" यु आर माय हार्ट

अँड आय ऍम व्हेरी स्मार्ट,

संसाराच्या रथाची आपण दोन चाकं

चल रथ करुया स्टार्ट."

ती म्हणाली, "खरय तुझं सगळं,

तुझं बोलणं, तुझं वागणं,

सगळंच कसं वेगळं,

पण मलाही भेटलाय एक हँण्डसम

त्याच्यासमोर तु वाटतोस कुछ-कुछ पानी कम."

"राईट-राईट," मी ओरडलो लाऊडली,

मनात म्हणालो, 'जाऊदे साली,

लडकी, बस और ट्रेन,

एक गयी तो दुसरी आली.'